महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारणार असल्याची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा

आगामी काळात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली. विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांच्या मनातला हा संभ्रम दूर व्हावा, याकरता संविधान भवनाच्या माध्यमातून वास्तव स्थितीची माहिती करून देण्यात येईल असं रिजिजू म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक सहकार्यातून उभारण्यात येणाऱ्या या संविधान भवनातून अल्पसंख्याक वर्गाच्या समस्यांचा निपटारा करण्यात येईल, तसंच महाराष्ट्रातील बौद्ध विहारांचा विकास करण्यात येईल असंही रिजिजू म्हणाले.