२०३० पर्यंत ३०० मेट्रिक टन पोलाद क्षमता गाठण्याचं भारताचं उद्दिष्ट – केंद्रीय मंत्री एच डी कुमारस्वामी

भारतानं २०३० पर्यंत ३०० मेट्रिक टन पोलाद क्षमता गाठण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. पोलादातील हरितक्रांती आणि शाश्वत नवोन्मेषता या विषयावर मुंबईत आयोजित ३६ व्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रीय पोलाद धोरण हे हरित परिवर्तनासाठी महत्त्वाचं असून हे धोरण हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर आणि संपूर्ण उद्योगात कार्बन फूटप्रिंट कमी करण्यावर भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

यावेळी भारतीय पोलाद क्षेत्रावरील हँडबुकचं प्रकाशन करण्यात आलं. तसंच पोलाद क्षेत्रातल्या कंपन्यांना यावेळी पुरस्कार देण्यात आले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.