२०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी तरुण आणि विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची – मंत्री जी. किशन रेड्डी

२०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी तरुण आणि विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावावी असं आवाहन केंद्रीय कोळसा खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केलं आहे. ते आज सिकंदराबाद इथं केंद्रीय विद्यालय संघटनेच्या वतीनं आयोजित ३ दिवसीय राष्ट्रीय एकता पर्वाचं उद्घाटन करताना बोलत होते.