November 8, 2024 8:11 PM

printer

मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते वैद्यकीय उपकरण उद्योग बळकटीकरण योजनेचा आरंभ

केंद्रीय रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीत वैद्यकीय उपकरण उद्योग बळकटीकरण योजनेचा आरंभ केला. यावेळी रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि औषधनिर्माण सचिव अरुणिश चावला उपस्थित होते. या योजनेमुळे मोठा फायदा होणार असून त्याचा दीर्घकाळ प्रभाव राहील, असं मत नड्डा यांनी व्यक्त केलं. वैद्यकीय उपकरण क्षेत्रात भारताला स्वावलंबी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं.