क्रीडामंत्री मनसुख मांडविय यांचा फिट इंडिया सायकल मोहिमेत सहभाग

केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी आज केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारत- तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांसोबत आज नवी दिल्लीत फिट इंडिया सायकल मोहिमेत भाग घेतला. मांडविया यांनी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम ते रायसीना हिलपर्यंत सैनिकांसोबत सायकल चालवली. देशभरात अकराशेहून अधिक ठिकाणी या मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सायकलिंग हा सर्वोत्तम व्यायाम असून  या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन मांडविया यांनी केले.