नवी दिल्लीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २३६वी बैठक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २३६ वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय  बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीकृत संकलनासाठी बँकांच्या निवडीसाठीचे निकष सुलभ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. नवीन निकषांमध्ये रिझर्व बँकेकडे सूचीबद्ध असलेल्या सर्व एजन्सी बँकांचा समावेश असेल. आरबीआय एजन्सी बँक नसलेल्या परंतु एकूण कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या संकलनामध्ये  किमान २ दशांश टक्के योगदान  असलेल्या इतर शेड्यूल्ड वाणिज्यिक बँकांच्या निवडीलाही  विश्वस्त मंडळाने मान्यता दिली.  हा निकष पूर्वी अर्धा टक्के योगदानाचा होता.