डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रतिरोधक संसर्गासाठी ‘नॅफिथ्रोमायसिन’ या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण

प्रतिरोधक संसर्गासाठी असलेल्या नॅफिथ्रोमायसिन या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्ली इथे केलं. जगभरात दरवर्षी 20 लाखांहून अधिक मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या औषध-प्रतिरोधक असलेल्या न्यूमोनिया आजाराविरूद्ध, नॅफिथ्रोमाइसिनची तीन दिवसीय उपचार पद्धती उल्लेखनीय ठरेल असं सिंग यांनी यावेळी सांगितलं.

 

मेड इन इंडिया असलेलं नॅफिथ्रोमायसिन अँटीबायोटिक हे जैवतंत्रज्ञान विभागाच्या बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिलच्या समर्थनाने विकसित करण्यात आलं असून Miqnafया नावाने ते बाजारात आणण्यात आलं आहे. प्रतिजैविक प्रतिकार-एएमआर चा सामना करणारं हे देशातलं पहिलं स्वदेशी विकसित प्रतिजैविक आहे.