पॅरासिटामोलची निर्मिती करण्यासाठी स्वदेशी तत्रंज्ञान विकसित

सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं पॅरासिटामोल या वेदनाशामक आणि तापावरच्या गुणकारी औषधाची निर्मिती करण्यासाठी एक स्वदेशी तत्रंज्ञान विकसित केलं आहे, अशी घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी केली आहे. ते आज सीएसआयआर च्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या संशोधनामुळे भारताला पॅरासिटामोलच्या निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होता येईल तसंच या औषधाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांसाठीचं आयातीवरचं अवलंबित्व कमी होईल, असं ते म्हणाले.