काँग्रेस शत्रुराष्ट्रांची भाषा बोलत असल्याचा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप

काँग्रेस शत्रुराष्ट्रांची भाषा बोलत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. नवी दिल्ली इथं ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. हातून सत्ता गेल्यामुळे अराजक माजवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. घुसखोरांना मतदार घोषित करुन काँग्रेसला सत्ता मिळवायची आहे, असं ते म्हणाले.