डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारताची स्मार्ट फोन निर्यात गेल्या महिन्यात विक्रमी -अश्विनी वैष्णव

भारताची स्मार्ट फोन निर्यात गेल्या महिन्यात विक्रमी १ अब्ज ८० कोटी अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. देशातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगत वैष्णव यांनी नॅशनल डेली या दैनिकातला एक लेख समाज माध्यमावर  सामायिक केला. देशभरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं उत्पादन सुरु झाल्यानं हजारो रोजगार निर्माण होतील, असंही ते म्हणाले.