डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मंत्री अश्विनी वैष्णव यांचा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी उपस्थित विशेष पाहुण्यांशी संवाद

७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी उपस्थित असलेल्या विशेष पाहुण्यांशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथे संवाद साधला. या सर्व पाहुण्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मन की बात कार्यक्रमातून समाजासाठी अथकपणे काम करत असल्याचा उल्लेख केला असं वैष्णव यांनी आकाशवाणी प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. तसंच प्रजासत्ताक दिनाच्या संचलन कार्यक्रमात सहभागी होण्याच्या अनुभवाविषयीही पाहुण्यांनी सांगितल्याचं वैष्णव म्हणाले. या संवादावेळी प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल, आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर तसंच दूरदर्शनच्या महासंचालक कांचन प्रसाद उपस्थित होते.