नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात सीएसआर परिषदेचं उद्घाटन आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. ‘पोषण सुरक्षा आणि कुपोषण निवारणामध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीची भूमिका‘ या विषयावरच्या या परिषदेत मुलांमधल्या कुपोषणाचा सामना करण्यासाठी सहयोगी, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत धोरणांवर विचारमंथन होणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळानं या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेदरम्यान अमित शाह यांच्या हस्ते शिशु संजीवनी उपक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असून त्याद्वारे महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये शिकणाऱ्या सुमारे तीन हजार मुलांना पौष्टिक आहार प्रदान करण्यात येणार आहे.
Site Admin | January 6, 2026 1:22 PM | National CSR Conclave | Union Minister Amit Shah
सीएसआर परिषदेचं केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन