केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जगदलपूर इथं शहीद सुरक्षा जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधला

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज छत्तीसगडमधे बस्तरच्या विभागीय मुख्यालयात, जगदलपूर इथं शहीद सुरक्षा जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. या कुटुंबाच्या समस्या सोडवण्यासाठी तसंच त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय, आदिवासी व्यवहार आणि ग्रामीण विकास मंत्रालय संयुक्तपणे एक विशेष योजना तयार करतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं.