डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री जीतन राम मांझी खादी महोत्सवाबाबत घेतली आढावा बैठक

खादी आणि ग्रामोद्योग योजनांवर लक्ष केंद्रित करून त्याच्या अंमलबजावणीसाठी सखोल आणि विस्तृत प्रयत्नांची गरज असल्याचं केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री जितन राम मांझी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत खादी महोत्सव २०२४ च्या आढावा बैठकीत बोलत होते. देशात खादीला चालना मिळण्यासाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. देशभरात लोकांना खादीची वस्त्रं वापरण्यासाठी प्रोत्साहन देत ग्रामीण भागात रोजगार निर्मितीत योगदान द्यावं असं आवाहन मांझी यांनी केलं आहे.