केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष शेलार, भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि इतर यावेळी उपस्थित होते. त्यानंतर शहा यांनी मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. तसंच वांद्रे पश्चिम इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेऊन पूजा केली.

गृहमंत्री शहा यांनी काल मुंबई समाचार या वर्तमानपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त तयार केलेल्या लघुपटाचं प्रकाशन केलं. प्रत्येकानं घरी मातृभाषेतच बोललं पाहिजे, असं आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.