डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं केलं अनावरण.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या त्रिशक्ती प्रवेशद्वारावर थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांच्या हस्ते शिल्पकार विपुल खटावकर आणि स्थापत्यकार अभिषेक यांचा सत्कार करण्यात आला. पेशवा बाजीराव स्मारकची योग्य जागा ही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हीच आहे कारण जिथून तीनही सेनांचे जवान भविष्याचे प्रशिक्षण घेतात ते बाजीराव यांच्या पुतळ्याकडून प्रेरणा घेतील आणि कित्येक वर्षांपर्यंत भारताच्या सीमांना कोणी हात लावण्याचं साहस करणार नाही असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा