डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 4, 2024 6:37 PM | Amit Shah

printer

चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या २४तास पाणीपुरवठा प्रकल्पाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

मोदी सरकार पूर्ण पाच वर्षं टिकेल, आणि २०२९ मधे पुन्हा रालोआ सरकारच सत्तेवर येईल  असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या २४तास पाणीपुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर  ते बोलत होते. देशातल्या जनतेनं प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यावर विश्वास ठेवला आहे, मात्र विरोधक हे सरकार अस्थिर असल्याचा अपप्रचार करीत आहेत असं ते म्हणाले.

फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रीयेत न्यायव्यवस्थेला सहाय्यभूत ठरतील अशा विविध सेवांचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं. इलेक्ट्रॉनिक स्वरुपातले पुरावे हाताळण्यासाठी न्याय सेतू, न्याय श्रुती आणि ई – समन्स या यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.