डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्र सरकार पूरव्यवस्थापनात शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून पुढं जात आहे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक आज नवी दिल्ली इथं झाली. पुराचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने दूरगामी धोरण तयार करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून पुढं जात असल्याचं शहा यांनी सांगितलं.

 

इस्रोने दिलेल्या उपग्रह चित्रांचा आणि इतर माहितीचा अचूक वापर आणि बचावाच्या दृष्टीनं उपलब्ध साधनसामुग्रीचा सुयोग्य वापर केला पाहिजे असं शहा म्हणाले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी वेळच्या वेळी करण्याचं आवाहन त्यांनी सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांना केलं. ठिकठिकाणच्या धरणांचे दरवाजे सुस्थितीत असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी केंद्रीय जल आयोगाला दिले.

 

हवामान, पाऊस, अतिवृष्टी, पूर,विजांचा कडकडाट यासंदर्भातले इशारे दूरचित्रवाहिन्या, एफ एम रेडियो आणि एसएमएसद्वारे जनतेपर्यंत पोचवावे असं त्यांनी हवामानशास्त्र विभागाला सांगितलं. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय तसंच विविध विभागांचे वरिष्ट सरकारी अधिकारी बैठकीला उपस्थित होते.