डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 8, 2024 8:12 PM | Amit Shah

printer

अमित शाह यांच्या हस्ते ‘मुंबई समाचार’ वृत्तपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त तयार केलेल्या लघुपटाचं अनावरण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आज आगमन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर अमित शहा यांनी मुंबई समाचार या वृत्तपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त तयार केलेल्या लघुपटाचं अनावरण केलं. १८२२ मधे मुंबईत सुरु झालेलं हे गुजराती वर्तमानपत्र आशिया खंडातल्या सर्वात जुन्या वर्तमानपत्रांपैकी एक आहे. 

गृहमंत्री शाह उद्या दिवसभर मुंबईतल्या विविध भागातल्या गणेश मंडळांना भेट देणार आहेत.