केंद्रीय अर्थमंत्र्यांची सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांबरोबर आढावा बैठक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजाचा आज आढावा घेत आहेत. नवी दिल्ली इथं होत असलेल्या  आढावा बैठकीत बँकांच्या ठेवी, कर्ज-ठेवी गुणोत्तर आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली वाढ यांचं  मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, पीएम सूर्य घर आणि प्रधानमंत्री विश्व कर्मा योजनांचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नवीन सरकारच्या कार्यकाळातली सीतारामन यांची बँकांबरोबरची ही पहलीच आढावा बैठक आहे.