डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अर्थसंकल्पात प्राधान्याच्या बाबींमध्ये समतोल साधला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

यंदाच्या अर्थसंकल्पात आर्थिक वाढ, रोजगार, कल्याण, भांडवली गुंतवणूक, आणि वित्तीय बळकटीकरण यासारख्या प्राधान्याच्या बाबींमध्ये समतोल साधला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला त्यांनी आज उत्तर दिलं. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या ब्रीद वाक्यावर सरकारचा विश्वास असून अर्थसंकल्पामुळे सहकारी संघराज्यवादाला प्रोत्साहन मिळाल्याचं त्यांनी म्हटलं. अर्थसंकल्पात कृषि क्षेत्रासाठी असलेल्या निधीत कपात केल्याचा विरोधकांनी केलेला आरोप त्यांनी फेटाळला. शिक्षण, रोजगार आणि कौशल्य यासाठी १ लाख ४८ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असल्याची माहिती त्यांनी दिली.