दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात प्रदूषण व्यवस्थापनाच्या कृती कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करायची गरज पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज अधोरेखित केली. इथल्या हवेच्या दर्जाचा आढावा घेण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रदूषण व्यवस्थापनाच्या वार्षिक कृती आराखड्याच्या अंमलबजावणीला वेग द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
Site Admin | December 3, 2025 6:08 PM | Bhupender Yadav
दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानीत हवेच्या दर्जाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक