November 11, 2025 8:13 PM

printer

वायू प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या ठोस कारवाईचे अहवाल सादर करण्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचे निर्देश

वायू प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या ठोस कारवाईचे अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान परिवर्तन मंत्री भूपेंदर यादव यांनी आज काही राज्यांना तसंच केंद्रशासित प्रदेशांना दिले. ते वाढत्या वायू प्रदूषणाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्ली इथं झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते. वायू प्रदूषणात भर घालणाऱ्या घटकांचं चोख व्यवस्थापन करण्याच्या सूचनाही यादव यांनी यावेळी दिल्या. त्यात काही ठिकाणचे शेतकरी जाळत असलेल्या पिकांच्या पालापाचोळ्याचा व्यवस्थापनाचा मुद्दाही समाविष्ट आहे.