डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 23, 2024 4:11 PM | Bhupender Yadav

printer

जगाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम करण्याची जबाबदारी देशाच्या युवाशक्तीवर – मंत्री भूपेंद्र यादव

संपूर्ण जगाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम करण्याची जबाबदारी देशाच्या युवाशक्तीवर आहे, असं प्रतिपादन पर्यावरण, वनं आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. मुंबईतल्या नरसी मोनजी शिक्षण संस्थेत विकसित भारतासाठी युवाशक्ती या कार्यक्रमाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. देश पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामान बदल रोखण्याच्या दिशेने काम करत असताना एका हरित आणि आणखी शाश्वत भविष्याच्या उभारणीसाठी युवाशक्तीनं पुढे यावं, असं आवाहनही यादव यांनी केलं. तत्पूर्वी यादव यांनी ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमातही भाग घेतला.