उत्तरप्रदेशात सेमीकंडक्टर उत्पादन कारखाना सुरु करण्यास केंद्राची मंजुरी

उत्तर प्रदेशात जेवर विमानतळाजवळ सेमीकंडक्टर उत्पादन कारखाना सुरु करण्याचा प्रस्ताव आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. एचसीएल आणि फॉक्सकॉन या कंपन्यांबरोबरचा हा संयुक्त प्रकल्प असून त्यात ३ हजार ७०० कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे. देशभरातल्या २७० शैक्षणिक संस्थांमधे आणि ७० स्टार्टअप्समधे जागतिक दर्जाच्या आरेखन तंत्रज्ञानाविषयी नवीन संशोधन सुरु आहे, असं ते म्हणाले.