पीएम स्वनिधी अर्थात प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजनेच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. त्यानुसार पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांना १० ऐवजी १५ हजार आणि दुसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांना २० हजार ऐवजी २५ हजार रुपये कर्ज मिळेल. तिसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांना मात्र ५० हजार रुपयेच कर्ज दिलं जाईल. या पुनर्रचनेमुळे ५० लाख नव्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल. आणखी अनेक शहरं आणि गावांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत कर्ज वितरणाची मुदत आता ३१ मार्च २०३० पर्यंत वाढवली आहे. या योजनेसाठी ७ हजार ३३२ कोटी रुपये इतकी तरतूद आहे.
२०३० मधल्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात आयोजित करण्यासाठी दावा दाखल करायलाही केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. अमदाबादमध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्याचा प्रस्ताव आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं गुजरातमध्ये कच्छपर्यंत नवा रेल्वेमार्ग आणि कर्नाटक, तेलंगणा, बिहार आणि आसाममधल्या रेेल्वेमार्गांच्या बहुपदरीकरणालाही मंजुरी दिली.