डिसेंबर २०२८ पर्यंत तांदळाचा मोफत पुरवठा सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत कृत्रिमरीत्या पोषणमूल्यांनी युक्त अर्थात फोर्टिफाईड तांदळाचा मोफत पुरवठा डिसेंबर २०२८ पर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. रक्ताल्पता आणि सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेची समस्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. फोर्टिफाईड तांदळाचा पुरवठा करण्याच्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी १७ हजार ८२ कोटी रुपयांच्यावर खर्च अपेक्षित आहे.