आगामी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थतज्ञांसोबतची पहिली बैठक घेतल्याची माहिती अर्थमंत्रालयाने समाजमाध्यमाद्वारे दिली. अर्थमंत्रालयाच्या अर्थ व्यवहार विभागाचे सचिव, केंद्र सरकारचे मुुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन आणि वरिष्ठ अधिकारी या बैेठकीला उपस्थित होते. यानंतर अर्थमंत्री कृषी क्षेत्रातल्या तज्ञांसोबत आणि शेतकरी संघटनांसोबत बैठक घेणार आहेत.