आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अर्थतज्ञ आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम हे देखील उपस्थित असतील.
२०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री एक फेब्रुवारीला सादर करतील. अमेरिकेने भारतावर लादलेलं ५० टक्के आयात शुल्क तसंच इतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा असेल.