October 1, 2024 2:57 PM

printer

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध – कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केला आहे. विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी आज त्यांनी नवी दिल्ली इथं चर्ची केली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बियाणं आणि खतांची उपलब्धता तसंच खतांचा अतिवापर या मुद्यांवर यावेळी अर्थपूर्ण विधायक चर्चा झाल्याचं शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितलं.