शेतकऱ्यांचं कल्याण ही केंद्र सरकारची प्राथमिकता – केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान

शेतकऱ्यांचं कल्याण ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. केंद्र सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल ते वार्ताहरांशी बोलत होते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत देशभरातल्या शेतकऱ्यांना २१ हजार कोटी रुपयांच्या मदतीचं वाटप करण्यात आलं, याचा लाभ ९ कोटी ५१ लाख शेतकऱ्यांना झाला असं चौहान म्हणाले. शेतकऱ्यांना किफायतशीर दर देण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यासाठी पीएम आशा योजना सुरू करण्यात आली आहे, सरकारने डिजिटल ऍग्रीकल्चर मिशनलाही मंजुरी दिली आहे, असं चौहान यांनी सांगितलं.