August 11, 2025 9:44 AM

printer

केंद्रीय कृषीमंत्री देशातल्या 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीक विम्याचे दावे वितरीत करणा

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आज राजस्थानातल्या झुंझुनू इथं एका कार्यक्रमात 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तीन हजार 200 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे पीक विमा दाव्यांचं वाटप करणार आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेतल्या गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या दाव्यांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे.

 

पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर प्रथमच एका कार्यक्रमातून नुकसानभरपाईचं वाटप होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना खरिपातल्या  नुकसानभरपाईपोटी 809 कोटी तर रब्बीसाठी 112 कोटी असे एकंदर 921 कोटी रुपये मिळणार आहेत.