एकात्मिक निवृत्तिवेतन योजना म्हणजे यूपीएसमध्ये निवडीसाठीच्या मुदतीत सरकारनं दोन महिने वाढ केली आहे. ही मुदत काल संपणार होती. मात्र, आता पात्र कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे कायदेशीर जोडीदार यांना तीस नोव्हेंबरपर्यंत आपली निवड निश्चित करता येणार आहे.
या योजनेत अनेक सकारात्मक बदल करण्यात आल्याचं अर्थ मंत्रालयानं काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या बदलांमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी यूपीएसच्या निवडीसाठी वेळ मागितल्यामुळे मुदतीत वाढ करण्यात आल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.