केंद्र सरकारच्या एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी

केंद्र सरकारने एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी केली आहे. नवीन निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सुधारणा करुन या योजनेची घोषणा सरकारने गेल्या ऑगस्टमधे केली होती. ही योजना येत्या १ एप्रिलपासून लागू केली जाईल. एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एकात्मिक निवृत्तीवेतन योजना लागू असेल, असं काल जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. केंद्र सरकारचे सध्याचे कर्मचारी किंवा भविष्यातल्या कर्मचाऱ्यांना एनपीएस अंतर्गत एकात्मिक निवृत्तीवेतन प्रणाली निवडण्याचा पर्याय असेल. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.