चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशात बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं आहे. बेरोजगारीचा दर २ दशांश अंकांनी घसरुन ५ पूर्णांक दोन दशांशांवर आला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत हा दर ५ पूर्णांक ४ दशांश टक्के होता. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी सांगते, की जुलै ते सप्टेंबर या काळात ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर ४ पूर्णांक ४ दशांश टक्के होता, तर शहरी भागात ६ पूर्णांक ९ दशांश टक्के लोक बेरोजगार होते. कमावत्या महिलांचं प्रमाण ३३ पूर्णांक ७ दशांश टक्के झालं जे पहिल्या तिमाहीत ३३ पूर्णांक ४ दशांश होतं.
Site Admin | November 10, 2025 6:41 PM
देशात बेरोजगारीचं प्रमाण ५ पूर्णांक दोन दशांश टक्क्यावर