डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 6, 2025 5:49 PM | Mahavitran

printer

‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ या संकल्पनेद्वारे महावितरण तर्फे विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती फेरी

महावितरणच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त ‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ या संकल्पनेद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी महावितरण तर्फे काल विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह अभियंते, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. राज्यात १ ते ६ जून दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. महावितरण प्रशासनानं आयोजित केलेल्या विद्युत सुरक्षा सप्ताहा दरम्यान आज अकोला जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा तसंच पथनाट्याच्या माध्यमातून वीज सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा