क्रिकेटमध्ये 19 वर्षाखालील महिला संघाची विश्वकरंडकाला गवसणी

19 वर्षाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी ट्वेंटी विश्वचषकावर, सलग दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. मलेशियातील क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात 9 गडी राखून भारताने, विश्वचषकाला गवसणी घातली. भारतानं 83 धावांचे नाममात्र उद्दिष्ट 12व्या षटकातच पार केलं. गोंगाडी त्रिशाने या विश्वचषकात सर्वाधिक 309 धावा केल्या. तिला सामनावीर तसच मालिकावीर पुरस्कार मिळाला. वैष्णवी शर्माने 6 सामन्यांमध्ये सर्वाधिक 17 बळी घेतले. यात हॅटट्रिकचादेखील समावेश आहे.