डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 21, 2025 8:33 PM | Under-19 Cricket

printer

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या १९ वर्षाखालच्या संघांमधे एकदिवसीय सामन्यात भारत विजयी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या, १९ वर्षाखालच्या संघांमधे आज ब्रिस्बेन इथं झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ७ गडी आणि ११७ चेंडू राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात २२५ धावा केल्या. भारतानं ३० षटकं आणि ३ चेंडू अवघ्या तीन गड्यांच्या मोबदल्यात २२७ धावा केल्या अभिज्ञान कुंडूनं नाबाद ८७, तर वेदांत त्रिवेदीनं नाबाद ६१ धावा केल्या. वैभव सूर्यवंशीनं ३८ धावांचं योगदान दिलं.