डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

चालू वर्षात भारताची अर्थव्यवस्था साडेसहा टक्के दरानं वाढणार असल्याचा युएनसीटीएडीचा अहवाल

जगभरात मंदीचं सावट असतानाही या वर्षात भारताची अर्थव्यवस्था मात्र साडेसहा टक्के दराने वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार आणि विकास अहवालात म्हटलं आहे. विकासाला चालना देणारा खर्च आणि वित्तीय धोरणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठं पाठबळ मिळत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
याच काळात चीनची अर्थव्यवस्था ४ पूर्णांक ४ दशांश टक्के दराने वाढत असून अमेरिकेची आणि युरोपियन महासंघाची अर्थव्यवस्था १ टक्के दराने वाढत आहे. फ्रांस , जर्मनी आणि इटली च्या अर्थव्यवस्था एका टक्क्याहून कमी दराने वाढत असून जपानच्या वाढीचा दर अर्ध्या टक्क्या पर्यंत खाली येऊ शकतो, असं या अहवालात म्हटलं आहे.