डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या अर्नाळा किनाऱ्याजवळची अनधिकृत रिसॉर्ट्स जमीनदोस्त

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या अर्नाळा किनाऱ्याजवळची अनधिकृत रिसॉर्ट्स आज जमीनदोस्त करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही रिसॉर्ट्स पाडण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशावरून महानगर पालिकेनं ही कारवाई केली.

 

शिवसेना नेते आणि परिवहन समितीचे माजी अध्यक्ष मिलिंद मोरे हे काल कुटुंबासह अर्नाळा किनाऱ्यावरच्या रिसॉर्टवर गेले होते. तिथे स्थानिकांसोबत वाद झाल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यातल्या दुखापतीमुळं हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं निधन झालं. मोरे यांच्या निधनानंतर घडलेल्या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी या भागातली सर्व अनधिकृत रिसॉर्ट्स पाडण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले होते.