डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मध्य पूर्व आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न वाढवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं आवाहन

हमास संघटनेचा राजकीय प्रमुख इस्माईल हनिया याची इराणमध्ये हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्व आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी  राजनैतिक प्रयत्न वाढवण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केलं आहे. चीन, रशिया, अल्जेरिया या देशांनी हनिया याच्या हत्येचा निषेध केला असून हे दहशतवादी कृत्य असल्याचं इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधल्या राजदूतानं म्हटलं आहे. तर मध्य पूर्वेत अस्थिरता निर्माण करणाऱ्या शक्तींना इराण पाठिंबा देत असल्याचं अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनं म्हटलं आहे. 

इस्रायलच्या हल्ल्यात झालेली हमास नेत्याची हत्या हे चिथावणीखोर कृत्य आहे, अशी प्रतिक्रिया संयुक्त  राष्ट्रांचे सरचिटणीस अंतोनियो गुटेरस यांनी दिली. या प्रदेशातला संघर्ष थोपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबावगट बनण्याची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले.