बांगलादेशातल्या सर्व घटकांनी संयम बाळगावा-अँटोनियो गुटेरेस

बांगलादेशातल्या सर्व घटकांनी संयम बाळगावा, देशात उसळलेला तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावा आणि हिंसाचारापासून दूर रहावं, असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केलं आहे. युवा नेते शरीफ उस्मान बिन हादी यांच्या हत्येचा निषेध करत, गुटेरेस यांनी बांग्लादेशी अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मानकांनुसार या हत्येची त्वरित आणि निष्पक्ष चौकशी करण्याचं आवाहन देखील केलं आहे.  दरम्यान, देशात फेब्रुवारी मध्ये संसदीय निवडणुका होणार असून त्यापार्श्वभूमीवर हादीच्या मृत्यूनंतर देशभरात झालेल्या हिंसाचाराला उत्तेजन देणाऱ्या आणि निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणण्याचा हेतू असलेल्या समाज माध्यमांवरच्या  पोस्ट वर कारवाई करण्याची मागणी बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं मेटाला केली आहे.