डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

इस्रायलने गाझापट्टीत ६ पत्रकारांना मारल्याचा संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क कार्यालयाकडून निषेध

इस्रायलने गाझापट्टीत हल्ला करून सहा पत्रकारांना मारल्याचा संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क कार्यालयानं निषेध केला आहे. या हत्येची निःपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी व्हावी असं संयुक्त राष्ट्राचे महासचिव अंतोनियो गुटेरस यांनी म्हटल्याचं संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टिफन दुजारीक यांनी सांगितलं. मारल्या गेलेल्या पत्रकारांपैकी पाच जण अल जझिरा या माध्यमसंस्थेचे वार्ताहर होते, तर एक जण स्थानिक पत्रकार होता. माध्यम अधिकार गट आणि कतारने सुद्धा या हत्येचा निषेध केला आहे. ब्रिटन सरकार या घटनेचा गांभीर्याने विचार करत असून स्वतंत्र चौकशीची मागणी करत आहे, असं  प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्या प्रवक्त्याने सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा