बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराबद्दल संयुक्त राष्ट्रसंघटनेकडून चिंता व्यक्त

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून,सर्व अल्पसंख्याकांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्यावर भर दिला आहे. गुटेरेस यांनी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रत्येक बांगलादेशी नागरिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी काम करेल, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदावरून हटवल्यानंतर झालेल्या राजकीय अशांततेनंतर बांगलादेशातील हिंसाचार वाढला आहे.