शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी केवळ ३५ टक्के उद्दिष्ट २०३० सालापूर्वी पूर्ण होऊ शकतील असं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलं आहे. ते शाश्वत विकास उद्दिष्ट २०२५ अहवालाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. शाश्वत विकास उद्दिष्ट मुदतीमध्ये पूर्ण करण्यात आलेलं अपयश जागतिक विकासातली आणीबाणीची परिस्थिती दर्शवत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
जगातले ८०० दशलक्ष पेक्षा जास्त लोक आजही अत्यंत गरिबीत असून जवळजवळ १८ टक्के उद्दिष्ट गाठण्यात आपण मागे राहिल्याचं ते म्हणाले. हवामान बदल, कर्ज संकट आणि जागतिक संघर्ष उद्दिष्टपूर्तीमध्ये अडथळा ठरत असल्याचं सांगून त्यांनी गाझा, युक्रेन, सुदान आणि पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं.