वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी सुरू झालेल्या उमीद या पोर्टलवर एक लाख ५१ हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. वक्फ कायदा केल्यानंतर हे पोर्टल सुरू करण्यात आलं होतं आणि संबंधितांना वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आज नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस असून अद्यापही लाखो मालमत्तांची नोंदणी झालेली नाही. पुढच्या तीन महिन्यांपर्यंत नोंदणी करणाऱ्यांवर मंत्रालयाकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही किंवा कठोर कारवाई केली जाणार नसल्याचं आश्वासन रिजिजू यांनी यावेळी दिलं.
Site Admin | December 5, 2025 1:30 PM | UMEED | Waqf Properties
वक्फ मालमत्तांच्या नोंदणीसाठी सुरू झालेल्या ‘उमीद’ पोर्टलवर दीड लाखापेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी