रशिया आणि युक्रेनमधला वाढत तणाव, आणि या प्रदेशात शांतता राखण्यासाठी सुरु असलेल्या अमेरिकेच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आज फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत २० कलमी शांतता योजना आणि अमेरिकेच्या संभाव्य सुरक्षा हमीवर चर्चा होईल. युक्रेन मधल्या कीव शहरावर काल रशियानं केलेल्या हवाई हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर शहराच्या अनेक भागातली वीज आणि हीटिंग सेवा खंडित झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.
दरम्यान, युक्रेनला वाटाघाटींनी तोडगा काढायचा नसेल, तर रशिया आपली उद्दिष्ट साध्य करत राहील, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे.