डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 27, 2025 9:19 AM | Ukraine | US

printer

युक्रेन-अमेरिकेदरम्यान खनिज भागीदारी करार आणि संरक्षणाची हमी यासाठी चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की उद्या व्हाईट हाऊसला भेट देतील आणि त्यांच्या देशातल्या दुर्मिळ खनिजांचा हक्क अमेरिकेला देणाऱ्या करारावर स्वाक्षरी करतील, असं जाहीर केलं आहे. युक्रेन युद्धावरही यावेळी एक करार करण्यात येईल. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत उद्घाटनपर भाषणात अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, सर्व काही निश्चित झालं असून युद्धामध्ये लोकांची हत्या थांबवण्यासाठी रशिया आणि युक्रेनसोबत आपण करार करणार आहेत. युक्रेन युद्धाचा थेट परिणाम युरोपवर होत असला,तरी त्या देशाला मदत करण्यासाठी अमेरिकेनं युरोपपेक्षा जास्त खर्च केला आहे असा दावा त्यांनी केला. अध्यक्ष ट्रम्प यांची झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या दोघांसोबत चर्चा झाली आहे.

 

दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितलं की खनिज भागिदारी आणि संरक्षणाच्या हमीबाबत अमेरिका आणि युक्रेनची पथकं वाटाघाटींची तयारी करत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.