February 26, 2025 1:23 PM | Ukraine | US

printer

युक्रेन-अमेरिकेची दुर्मिळ खनिजांच्या उत्खननासह व्यापक आर्थिक कराराबाबत सहमती

युक्रेन आणि अमेरिका यांनी दुर्मिळ खनिजांच्या उत्खननासह व्यापक आर्थिक कराराबाबत सहमती दर्शवली आहे. करारावर स्वाक्षरी केल्यानं युक्रेनला तातडीने अमेरिकेची लष्करी मदत मिळणार असल्याची आशा असल्य़ाचं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ट्रम्प प्रशासनानं अद्याप या करारावर कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की शुक्रवारी एका मोठ्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी अमेरिकेत येणार असल्याची माहिती ट्रम्प यांनी पत्रकारांनी दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.