नाटो आणि अमेरिकेच्या मदतीनं युक्रेन रशियाकडून आपला सर्व भूभाग परत जिंकू शकतो असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आपण आता लष्करी आणि आर्थिक परिस्थिती पूर्णपणे समजून घेण्यास सुरुवात केली असून रशिया म्हणजे प्रचंड आर्थिक समस्या असलेला कागदी वाघ आहे असं मत ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात व्यक्त केलं आहे. युद्धभूमीवर आपल्या छोट्याशा शेजारी देशाला हरवण्यात रशियला अपयश आल्याची टीकाही त्यांनी केली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर ट्रम्प यांनी आपली भूमिका बदलली. या भूमिकेचं झेलेन्स्की यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान,संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी जमलेले युरोपिय नेते मात्र ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्याच्या अर्थाबाबत संभ्रमावस्थेत आहेत.
Site Admin | September 24, 2025 10:38 AM | Ukraine Russia War
नाटो आणि अमेरिकेच्या मदतीनं युक्रेन रशियाकडून सर्व भूभाग परत जिंकू शकतो – डोनाल्ड ट्रम्प
